अंतिम सत्राची परीक्षा घेण्याच्या निर्णयात राज्यपालांची लुडबुड
करोणामुळे 2020 साल जीवनातून नष्ट झाला आहे. हे वर्ष उगवले हे विसरून जायला हवे इतका वाईट काळ कधी आला नव्हता. सर्वच वाया गेले तेथे शैक्षणिक वर्ष तरी कसे वाचतील ते ही वाया जाताना दिसत आहे.
त्यात महाराष्ट्राच्या आदरणीय राज्यपालांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्या असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला आहे.
हा सर्व वाद राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे झाला आहे. मुळात हा वाद नाही सामंत यांनी आपले मत व्यक्त केले आहे. कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील विद्यापीठांना पदवीच्या अंतिम वर्षाच्या शेवटच्या सत्रातील परीक्षा घेणे कठीण होणार आहे.
महाराष्ट्रातील विद्यार्थी संख्या दहा लाखांच्या घरात आहे हे लक्षात घेतले तर सामाजिक अंतर आरोग्यविषयक सुरक्षा वगैरेंचे पालन करून परीक्षा घेणे अवघड होईल आणि ते खरेच आहे.
देशात जशी आरोग्य आणीबाणी आहे तशी शैक्षणिक आणीबाणी सुद्धा आहे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एक सरळसोट भूमिका घेतली.
विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा विचार करून अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ नयेत व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनांनुसार ग्रेट प्रदान करणे शक्य आहे काय याबाबत विचारणा केली आहे. अशी विचारणा करणे मत व्यक्त करणे म्हणजे अंतिम निर्णय घेतला असे होत नाही
मंत्रीमहोदय यांनी परस्पर विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र पाठवले व राजभवनात याबाबत अंधारात ठेवले असे राज्यपाल यांचे मत आहे.
राज्यपाल हे कुलपती असतात सर्व विद्यापीठांचे प्रमुख म्हणून काम पाहतात. देशात पूर्व अनेकदा असेही राज्यपाल होऊन गेल की त्यांनी शिक्षणाचा फार संबंध कधी आला नाही पण ते कुलपती म्हणून राजभवनात विराजमान झालेले.
ज्ञान व शहाणपण यात फरक आहे असे राज्यपालांना सांगावे लागेल
admin@emtionalhaunt.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Ask your question here