मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Enjoy Latest Podcast

हीच ती वेळ निकालाची

सदर शासनाने दिलेल्या निकालाच्या वेळा जवळ येताहेत. “मला चांगले मार्क्स मिळावे” हाच विचार ठेऊन तुमचा पाल्य वर्षभर शैक्षणिक चक्कीत भरडला गेलाय. प्रायव्हेट कोचिंग, शाळा आणि सर्वात जास्त कोंडीमारा करणारे ते future career planning चे लेक्चर्स. या सर्वांचा ताण घेऊन फक्त एकच आशेचा किरण असतो तो म्हणजे निकालाचा क्षण. निकाल जर चांगला लागला तर घरात सर्वत्र आनंदमय वातावरण तयार होतं आणि हाच निकाल मनासारखा नाही लागला तर संपुर्ण वातावरण दु:खमय व हतबल झालेलं दिसते.  त्यांत नातेवाईकांचे ते तुलनात्मक वाक्य, काळजावर घाव घालणारी ती वागणुक. पण “हीच ती वेळ” जेव्हा तुम्ही तुमची मानसिक स्थिती चांगली ठेऊन मिळालेलं अपयश स्वीकारुन पुढची पाऊलं उचलण्यास तुमच्या पाल्यास सहकार्य करणं गरजेचं असतं. त्याच मनोबल वाढवणं, त्याला भविष्याच एक उज्ज्वल स्वप्न दाखवणं हीच पालकांची त्यावेळेस जबाबदारी असते.  परंतु काही पालक ती जबाबदारी पार पाडतांना दिसत नाहीत. फक्त काही मोजक्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया आल्यानंतर बरेचसे पालक त्यांच्या मुलांना दोष देणं सुरु करतात, रागवतात, चिडतात. हेच जे नातेवाईक असतात ना यांतले कित्येकांनी तर ऐन