मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Enjoy Latest Podcast

माणुस जगला किती ?

आजच्या या धावत्या जगात माणसाची जगण्याची क्षमता कमी झालीये. मोजून ५० वर्षे जगला म्हणुन खुप झालं असं म्हणणं हीच काळाची गरज झालीये. पण ही ५० वर्ष तरी माणुस स्वत: साठी जगतो का ?  वय वर्ष ०-५ या कालावधीत बाल अवस्थेत हा जीव अगदी निरागस, स्वच्छंद, मनमोकळा वावरत असतो. त्यात झोप हाच सर्वात महत्वाचा मुद्दा असतो.  ५ वर्षांनंतर तो जीव शालेय जीवनात प्रवेश करतो. मग विद्यालयीन शिक्षण पुर्ण करुन एक पदवी घेऊन या धावत्या जगात स्वत: च अस्तित्व शोधण्यास धावत असतो.  प्रामुख्याने दिवसाचे २४ तास त्यातले ८ तास झोपेत , १ तास त्याची स्वत: ची तयारी, १ तास सकाळ संध्याकाळ जेवण, ६ तासाची शाळा काॅलेज अथवा ८ तासाची नोकरी, रोजचं अपडाऊन १ तास, यातून उरतात फक्त ५ तास, ज्या ५ तासा त हा माणुस कितीसा जगणार ? ५० - ५ = ४५ वर्ष ४५ वर्ष = ३६५ x ४५ = १६४२५ दिवस = ३,९४,२०० तास यातुन माणुस जगतो फक्त ७८,८४० तास ( ३२८५ दिवस ) म्हणजे फक्त ९ वर्ष माणुस स्वत: साठी वेळ काढु शकतो . ५० वर्षाच्या काळात फक्त ९ वर्ष जर माणुस जगतोय तरीपण या वेळेतसुद्धा त्यांचे पालक, नातेवाईक व इतर महत्त्वपूर्ण व्यक्ती अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर लादत असता