आजच्या या धावत्या जगात माणसाची जगण्याची क्षमता कमी झालीये. मोजून ५० वर्षे जगला म्हणुन खुप झालं असं म्हणणं हीच काळाची गरज झालीये. पण ही ५० वर्ष तरी माणुस स्वत: साठी जगतो का ?
वय वर्ष ०-५ या कालावधीत बाल अवस्थेत हा जीव अगदी निरागस, स्वच्छंद, मनमोकळा वावरत असतो. त्यात झोप हाच सर्वात महत्वाचा मुद्दा असतो.
५ वर्षांनंतर तो जीव शालेय जीवनात प्रवेश करतो. मग विद्यालयीन शिक्षण पुर्ण करुन एक पदवी घेऊन या धावत्या जगात स्वत: च अस्तित्व शोधण्यास धावत असतो.
प्रामुख्याने दिवसाचे २४ तास त्यातले ८ तास झोपेत, १ तास त्याची स्वत: ची तयारी, १ तास सकाळ संध्याकाळ जेवण, ६ तासाची शाळा काॅलेज अथवा ८ तासाची नोकरी, रोजचं अपडाऊन १ तास, यातून उरतात फक्त ५ तास, ज्या ५ तासात हा माणुस कितीसा जगणार ?
५० - ५ = ४५ वर्ष
४५ वर्ष = ३६५ x ४५ = १६४२५ दिवस = ३,९४,२०० तास
यातुन माणुस जगतो फक्त ७८,८४० तास ( ३२८५ दिवस ) म्हणजे फक्त ९ वर्ष माणुस स्वत: साठी वेळ काढु शकतो. ५० वर्षाच्या काळात फक्त ९ वर्ष जर माणुस जगतोय तरीपण या वेळेतसुद्धा त्यांचे पालक, नातेवाईक व इतर महत्त्वपूर्ण व्यक्ती अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर लादत असतात.कित्येक वर्ष तर या अपेक्षा पुर्ण करण्यातचं निघुन जातात. त्यात परिवाराचे नियम व अटी या पाळण्यात कितीतरी मन मारुन त्याला जगावं लागत.
माझ्या मते तरी माणसाने स्वत: बद्दल स्वार्थी होणं जास्त चांगल. स्वत: चा वेळ स्वत:साठीच वापरुन जर तो व्यक्ती जगु शकत नाही तर एक चांगल्या व्यक्तीचा सहवास तो गमावत असतो. पण हे जगायच्या दिवसात त्याच्याकडे महत्वाची अशी फक्त एकच गोष्ट हवी, “पैसा”.
पैसा जर नसेल तर सर्व सुखसोयींचा उपभोग तो व्यक्ती घेऊ शकत नाही. राहिला प्रश्न समाजातील मानसन्मानाचा, तर त्यासाठी त्याचे कर्म चांगले हवेत. स्वभाव चांगला हवा आणि या गोष्टी असतील तर साहजिकच समाजात ती व्यक्ती आदराची भागिदार होते.
चि. सुयोग एकनाथ सरोदे.
(स्थापत्य अभियंता)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Ask your question here