सदर शासनाने दिलेल्या निकालाच्या वेळा जवळ येताहेत. “मला चांगले मार्क्स मिळावे” हाच विचार ठेऊन तुमचा पाल्य वर्षभर शैक्षणिक चक्कीत भरडला गेलाय. प्रायव्हेट कोचिंग, शाळा आणि सर्वात जास्त कोंडीमारा करणारे ते future career planning चे लेक्चर्स.
या सर्वांचा ताण घेऊन फक्त एकच आशेचा किरण असतो तो म्हणजे निकालाचा क्षण. निकाल जर चांगला लागला तर घरात सर्वत्र आनंदमय वातावरण तयार होतं आणि हाच निकाल मनासारखा नाही लागला तर संपुर्ण वातावरण दु:खमय व हतबल झालेलं दिसते.
त्यांत नातेवाईकांचे ते तुलनात्मक वाक्य, काळजावर घाव घालणारी ती वागणुक. पण “हीच ती वेळ” जेव्हा तुम्ही तुमची मानसिक स्थिती चांगली ठेऊन मिळालेलं अपयश स्वीकारुन पुढची पाऊलं उचलण्यास तुमच्या पाल्यास सहकार्य करणं गरजेचं असतं. त्याच मनोबल वाढवणं, त्याला भविष्याच एक उज्ज्वल स्वप्न दाखवणं हीच पालकांची त्यावेळेस जबाबदारी असते.
परंतु काही पालक ती जबाबदारी पार पाडतांना दिसत नाहीत. फक्त काही मोजक्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया आल्यानंतर बरेचसे पालक त्यांच्या मुलांना दोष देणं सुरु करतात, रागवतात, चिडतात. हेच जे नातेवाईक असतात ना यांतले कित्येकांनी तर ऐन प्रसंगी मदतीच्या वेळी हात वर केलेले असतात. तरी फक्त माझी मान माझ्या मुलामुळे खाली गेली म्हणुन मी माझ्या मुलावर संताप करेल तर ही पालकाची अतिशय चुकीची भूमिका दिसुन येते.
याउलट जेव्हा ही अवघी दुनिया तुमच्या मुलाच्या निंदेचे छापे बाहेर उमटवत असते, तेव्हा तुम्हीच त्या विद्यार्थ्याला त्याची मानसिक स्थिती टिकवण्याचं सहाय्य करायला हवं.
प्रत्येकाच्या प्रगतीचा एक विशिष्ट काळ असतो. तो व्यक्ती त्याच अनुकुल काळातच त्याची प्रगती करत असतो. आयुष्यात कितीही प्रतिकुल वेळ आली तरी तुमचा वेग कमी न करता मेहनत करावी कारण त्या वेगाने ती प्रतिकुल वेळ सुद्धा निघुन जाईल.
तसचं अनुकुल वेळेत सुद्धा वेग मात्र सारखाच हवा जेणेकरुन जास्तीत यशाची उंच शिखरं तुम्हाला चढता येतील.
आयुष्यात वेग हवाच, बदलायचा तो फक्त त्या गोष्टीकडे बघायचा दृष्टीकोन. जो तुमचं आयुष्य बदलवेल.
चि. सुयोग एकनाथ सरोदे.
(स्थापत्य अभियंता)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Ask your question here