बालपणी हुशार आहे असे नाव त्याचे गाजले, दहावी पास होऊनी बारावीत मात्र ढोलताशे वाजले... इंजिनीअरिंगच्या प्रवेशास एक मार्क कमी पडला, तेव्हाचं खरा OBC चा नियम त्याला नडला... अपयश हाती येतां सर्व नाती झालीत उसनी, काय करावं भविष्याचं हीच त्याच्या जीवास कासनी... आशेच्या त्या किरणावर त्यानं डिप्लोमा केला, नाही ठेवला कुणाच्या उपकारांचा ठेला... त्या वर्षात प्राध्यापकही जिव्हाळ्याचे भेटले, तेसुद्धा काही नातेवाईकांच्या डोळ्यात दाटले... हरवण्यासाठी तुजला लाख गनिमी कावे झाले, पण हार कसला मानतो तो कित्येक आले अन् कित्येक गेले... यशाची दोरी हाती येतां साठले सर्व नातेवाईक अन् मित्र, परिस्थितीशी दोन हात केलेल्या महाजनांचा तो सुपुत्र... दिवस जाता जाता बदल हे वेळेने घडवले, साथ सोडुनी गेलेल्या भामट्यांना मी त्याच दिवशी पळवले... बापकमाई वर होता त्याचा पंचक्रोशीत डंका, स्वकमाई येताचं नको वाटे ती सोनियाची लंका... यशाची शिखरं गाठीत जाता लाख नवे संबंध उभारुन आले, प्रगती बघुनी कित्येक जळाले अन् कित्येक मेले... वेळेच्या त्या दैवताला कोटी करतो मी प्रणाम, ही वेळं बदलली नसती तर नसता मिळाला दाम... या अतुलनीय यशा...
Marathi Podcasts, Latest News, old marathi speeches, informative blogs, interesting facts