बालपणी हुशार आहे असे नाव त्याचे गाजले,
दहावी पास होऊनी बारावीत मात्र ढोलताशे वाजले...
इंजिनीअरिंगच्या प्रवेशास एक मार्क कमी पडला,
तेव्हाचं खरा OBC चा नियम त्याला नडला...
अपयश हाती येतां सर्व नाती झालीत उसनी,
काय करावं भविष्याचं हीच त्याच्या जीवास कासनी...
आशेच्या त्या किरणावर त्यानं डिप्लोमा केला,
नाही ठेवला कुणाच्या उपकारांचा ठेला...
त्या वर्षात प्राध्यापकही जिव्हाळ्याचे भेटले,
तेसुद्धा काही नातेवाईकांच्या डोळ्यात दाटले...
हरवण्यासाठी तुजला लाख गनिमी कावे झाले,
पण हार कसला मानतो तो कित्येक आले अन् कित्येक गेले...
यशाची दोरी हाती येतां साठले सर्व नातेवाईक अन् मित्र,
परिस्थितीशी दोन हात केलेल्या महाजनांचा तो सुपुत्र...
दिवस जाता जाता बदल हे वेळेने घडवले,
साथ सोडुनी गेलेल्या भामट्यांना मी त्याच दिवशी पळवले...
बापकमाई वर होता त्याचा पंचक्रोशीत डंका,
स्वकमाई येताचं नको वाटे ती सोनियाची लंका...
यशाची शिखरं गाठीत जाता लाख नवे संबंध उभारुन आले,
प्रगती बघुनी कित्येक जळाले अन् कित्येक मेले...
वेळेच्या त्या दैवताला कोटी करतो मी प्रणाम,
ही वेळं बदलली नसती तर नसता मिळाला दाम...
या अतुलनीय यशाची शिदोरी खाईल त्या उंच शिखरी,
नको मजला ती खोट्या वशिल्याची भाकरी...
स्वकर्तृत्वाने मिळवलेल्या ओळखीने गाजतो आज परगावी,
आठवतो तो दिवसही जेव्हा हिणवलं होतं त्यांनी मलाच माझ्या गावी...
लेखक : चि. सुयोग एकनाथ सरोदे. (स्थापत्य अभियंता)
पांगळ प्रेम.....
सहज एका दिवशी Snapchat सुरु केलं,
त्यात तिची request होती,
ना मी तिला ओळखत होतो ना ती मला ओळखत होती,
तरीपण मैत्री करायची इच्छा दोघं बाजुनं होती...
झेराॅक्सच्या नावाखाली तिनं भेट ही काॅलेज रोड ला घडवली,
पण मला वाटलं मीच तिला पटवली...
पुढच्या भेटीसाठी माझ्या वाढदिवसाची पार्टी सबब ठरली,
आता मात्र ती मनातचं उतरली....
मोबाईलच्या नंबरासोबतचं भावनाही दिल्या गेल्या,
नंतर काय सिटी सेंटर, अन् हाॅटेल्स मध्ये भेटीही लाख झाल्या....
दोघांच्या मनांत भावनेचे तार कुठंतरी गुंफत होते,
पण भविष्यात काय होईल हे कुणासही ठाऊक नव्हते....
प्रेमाच्या या भेटीसाठी कितीतरी गनिमी कावे झाले,
कधी नाशकातुन पुणे तर पुण्यातुन नाशिक पंख पसरवावे लागले....
सर्व भविष्याचे नियोजन करुन करुन झाले,
तेवढ्यात मात्र कोरोनाचे आगमन झाले....
माणसांसह नातेही दुरावले,
भुतकाळातले सर्व गैरसमज याच लाॅकडाऊन मध्ये उगवले....
दिवसांसोबत नातेही दुर जात होते,
१७६० ओळखी काढुन बनवलेले नाते दिवसेंदिवस कमकुवत होतं
होते.....
त्यानं तिच्या करीता सर्व सोडावं,
तिनं मात्र मी घरच्यांचा शब्दाबाहेर नाही असचं म्हणावं.....
शेवटी जीवापाड केलेल्या प्रेमाला तिनं पैशात तोलावं,
अस सर्व वातावरण बघुन त्यानं तरी काय बोलावं....
आयुष्याच्या वाटा चुकलेत असं त्यानेचं म्हणावं,
कोरोनासोबतचं हे पांगळ प्रेमही लाॅकडाऊन मध्येच संपवाव....
लेखन व शब्दरचनाकार :
चि. सुयोग एकनाथ सरोदे.
(स्थापत्य अभियंता)
अपेक्षांचं ओझं
काल सहज तिची खुशाली विचारावयास मी तिला काॅल केला,
ती हॅलो म्हणताच बिथरून गेलो कारण रडतांनाची कापरी मला तिच्या आवाजात जाणवत होती,
कारण कुटुंबीयांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन ती आयुष्याचा प्रवास करत होती,
वाघीणीचं दुध तिच्या पचनी पडत नव्हतं, करीसुद्धा रोज मात्र पोटभर पित होती,
आयुष्य तिचं चार भिंतीत कोंडवुन ती जगत होती,
घरच्यांना सांगूनही घरची मंडळी तिला काडीमात्र जुमानत नव्हती,
थांब सखे अशी खचु नकोस येईल तो सोनियाचा दिवस तुझ्याही आयुष्यात,
ज्या दिवशी हे ओझं तुला हलकं झालेलं असेलं,
तेव्हा गर्वाने थोपटशील पाठ तुझी जेव्हा हे आयुष्यांतर तु मरत मरत का होईना पण कापलेलं असेल,
कधी गरज पडली तर आठवं या दुबळ्याला,
भलेही तुझं ओझं वाहु शकणार नाही पण आयुष्याच्या या शर्यतीत तुला मागे कधी पडु देणार नाही,
फक्त काहीच वर्ष राहीलीत आता,
मग संगच ओझी वाहु या अपेक्षांची,
आनंदाश्रु येतील तेव्हा एवढं सर्व त्यागल्याची,
पण काय सांगु तुला तेव्हा शब्द नसतील याच लोकांना बोलायला,
म्हणुन परत एकदा सांगतो तुला,
माघारी तु कधी फिरु नकोस,
थकली तरी कधी हार मानु नकोस,
पाठीशी नाही सोबतचं आहे मी तुझ्या,
येणार्या संकटांना कधी घाबरु नकोस...
- सुयोग एकनाथ सरोदे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Ask your question here