मुख्य सामग्रीवर वगळा

Enjoy Latest Podcast

आजचे आदर्श आणि आपण!!






नुकतीच  महाविद्यालयांमधील  स्नेहसंमेलने  आटोपली ,अशाच  एका  कार्यक्रमात आजच्या  तरुणाईचा  अगदी जवळून वेध घेता आला .फॅशन शो  हे मोठं  आकर्षण  असत  अशा कार्यक्रमांमध्ये  आणि मुलांमध्येही  मोठा उत्साह दिसतो .पहिल्याच फेरीत  देखण्या  तरुणांचा   आणि सुंदर ललनांचा झोकात रॅम्प वॉक पार पडला .आता दुसरी फेरी पर्यवेक्षकांच्या प्रश्नोत्तरांची  होती, मुलंही प्रश्नांची समर्पक उत्तरे देत होती, एकाला प्रश्न विचारला कि तुमचे आदर्श कोण ? त्याने क्षणाचाही विलंब करता उत्तर दिले कि  ....सर हे माझे आदर्श  आहेत मी त्यांची प्रत्येक गोष्ट फॉलो  करतो अगदी  त्यांची वेशभूषा ,केशभूषासुद्धा . आता हे संभाषण ऐकणारी मी मात्र  गोंधळात पडले की अरे हे .....  सर कोण , आपण तर त्यांना ओळखत पण नाही  जे आपल्या मुलांचे आदर्श आहेत .घरी गेल्यागेल्या आधी गुगल सर्च  केलं तेव्हा समजलं कि हे ..... सर टिकटॉक फेम नट  आहेत जे आधी दुकानात  काम करत पण  खूप मेहनत करून किंग ऑफ टिकटॉक हा 'किताब मिळवणारी हस्ती आहेत . मग मात्र विचार आला कि आता हाच प्रश्न आपल्या पिढीला असता तर नक्कीच आपले आदर्श इतिहासकालीन आहेत पण आजची पिढी त्यांचे आदर्श वर्तमानातच स्वत:च्या अवतीभोवती शोधून त्याचं अनुकरणही  करतेय.पण कधी कधी वाटते की तरुणांच्या वैचारिक क्षमता, तत्त्वांचा पाया हा त्यांच्या किशोरवयातच  पक्का रुजतो ज्यावर त्यांचा संपुर्ण आयुष्यभर प्रभाव असतो,मग आपल्या तरुणाईने असे कालातीत, मृगजळ असणारे आदर्श स्वीकारले तर आयुष्याची लढाई,जगरहाटी सर करतील का?  

थोड्याच दिवसांपूर्वी  शिवजयंती साजरी झाली तेव्हा हेच सळसळते रक्त,  छत्रपती शिवरायांचा प्रताप ,मुत्सद्देगिरी,स्त्रियांप्रती  सन्मान  वडीलधाऱ्यांच्या आदर  त्यांची शिकावण  प्रत्येक कृतीतून दर्शवत होती. ह्यावरून एक  निष्कर्ष नक्कीच काढता येतो कि आजची तरुणाई जितकी आधुनिक होतेय तितक्याच उत्साहाने आपल्या प्राचीन आणि इतिहासकालीन ठेवा ही जतन  करण्याचा आटोकाट  प्रयत्न करतेय.पण कधी कधी ह्या आधुनिक  विचारांची आणि आपल्या  जुन्या  परंपरांची  सांगड घालताना त्यांची दमछाक होतेय.  हाताशी आयतीच आलेली रक्कम , पालकांचे कनवाळू धोरण आणि दिमतीला असलेली सामाजिक माध्यमे ह्या सगळ्यांचा गुंता त्यांच्याभोवती वाढतोय. या परिस्थिती पाहता मला माझ्या रचनेत वाटते  की 

      ओतीव ज्ञानाच्या मूर्तींचा पसाराचं मांडलाय  सारा
जिवंत संवेदनशील शिल्पाचा  हरवला  कुठे  गाभारा ,
उसन्या तत्वज्ञानाची परंपरागत प्रतीकांची आधुनिकतेशी घालमेल
क्षितिजापर्यंत पोहोचलीय  स्वप्नांची  रेलचेल ,
ह्या सगळ्यांचा नाहीच कुठे अंत ,
बस , निर्वीकारा बघ जरा वळून दिसतेय का तुला
जोंधळ्यांसाठीची भ्रांत. 

आज एक पालक ,शिक्षक किंबहुना समाज म्हणून आपली जबाबदारी वाढत  आहे ,आपल्या शिक्षण क्षेत्रातल्या आव्हानांचे स्वरूप बदलत आहे .पूर्णवेळ नोकरी करणारे पालक ,एकत्र कुटुंबपद्धतीचा झालेला ऱ्हास , ह्यातून एकलकोंडी झालेली संपूर्ण एक  पिढी, माहितीचा भरमसाठ मारा,  वेळेचा अभाव ,बदलती जीवनशैली ह्या सर्व घटकांचा  समावेश आपल्याला आधुनिक समस्या म्हणून करता येईल . आजची पिढी नकार पचविणे ,अपमान सहन करणे ,पराभव स्वीकारणे  ह्या मानसिकतेतच  नसते. ह्याचा भयंकर परिणाम हा वाढत्या आत्महत्या त्याही अगदी अजाणत्या पाचवी च्या मुलांपासून ते सुज्ञ शिकल्या सावरल्या तरुणांपर्यंत , वाढते हरेक प्रकारचे गुन्हे ह्यातून अधोरेखित होते. हातात आयत्याच आलेल्या दृक-श्राव्य साधनांमुळे तरूणाई वेळेआधीच प्रौढ होतेय त्यांच्यावर हा प्रभाव इतका आहे की आभासी दुनिया वास्तवात जगू पाहताय पण शालेय महाविद्यालयीन मखमली आयुष्य संपून जगाच्या पाठीवर होणारी जोंधळ्यांसाठीची पायपीटीची जाणीव आपण करुन द्यायची आहे.  वरील समस्यांचे  निराकरण  करणे ही  काळाची गरज आहे त्यात समाधानाची बाब हीच कि तरुणाई आजही आपली पाळेमुळे ,संस्काराची बीजे  मनात कुठेतरी खोलवर रुजवून आहे गरज आहे ती आपण  समाज म्हणून योग्य पाऊले उचलून  ह्या बीजाचा वटवृक्ष व्हावा  अशी धोरणे स्वीकारण्याची ,पिढ्यांमधील संपत चाललेला संवाद पुन्हा सुरु करण्याची , मुलांना आपला वेळ देण्याची आणि एक सुदृढ मन घडवण्याची .

Prof.Pratibha Chikhale
Asst. Professor
G.H.Raisoni Jalgaon


टिप्पण्या

  1. Nice Article. Its todays reality. And also the view which is explained is true. Because of digital world it can happend.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

Ask your question here

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द, ग्रेड नको असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 'बेस्ट ऑफ टू' चा पर्याय

 राज्यातील करणाचा वाढत असलेला विळखा आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांची मानसिकता व त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्यस्तरीय समितीने वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय निश्चित केला आहे.  त्यामुळे आता मागील सत्रातील गुणांच्या सरासरी वरून 50 टक्के तर अंतर्गत मूल्यमापनावरून 50 टक्के गुण देऊन त्यांच्या ग्रेट नुसार मूल्यमापन केले जाणार आहे.  मात्र या विद्यार्थ्यांना ग्रेड मान्य नसेल त्यांना  अपग्रेडेशन साठी संधी दिली जाणार आहे. अपग्रेडेशन ची परीक्षा दिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना पूर्वी दिलेल्या ग्रेट पेक्षा अधिक गुण मिळाले, तर ते गुण ग्राह्य धरले जातील अन्यथा पूर्वीच्या ग्रेट  तसाच राहणार आहे.   प्रथम व द्वितीय वर्षातील राज्यातील सुमारे 40 लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा करण्याच्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे. तर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक  सूचनांनुसार 1 ते 31 जुलैपर्यंत अंतिम वर्षातील सुमारे दहा लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन झाले होते. तत्पूर्वी 1...

तेरी प्रीत को मन तरसे है

तेरी प्रीत को मन तरसे है, अंखिया तरसे दर्शन को। दिन कटता है तेरी राह में, रात तेरी शुधियों में। सूने है यमुना के तीर, समझ भी जा अब मेरी पीर। तेरी याद में अँखिया बरसे, मन सावन को तरसे। वंशीधर, विशधर के स्वामी, आ जाओ गोकुल में। तरस रही गोकुल की गलियां, धुल पॉव को तरसे। होली में सूखी है सखिया, सूखा पचरंग चीर। अंजुरी तरसे तेरी छुअंन को, तन बहो को तरसे। तेरी प्रीत को मन तरसे है, अंखिया तरसे दर्शन को।   -  Dr. Raj Bahadur Singh                       Assistant Professor                NIT, Hamirpur

EDUCATED GIRL - A Superfluous personality or Key Player?

A great proverb says “If you educate a man you educate an individual, but if educate a woman you educate a family i.e. a nation". But how many people in India genuinely follow this proverb? A mere 50% follow it, rest are still narrow minded and think education is not meant for girls. 'Girls are only supposed to do household chores, look after their family and take no interest in the latest affairs going on in the society and in the world' this is the thinking of many backward people around us. Now-a-days girls are moving ahead with great success in each and every field, be it wrestling or going to outer space. Girls are standing head to head with boys in every field and becoming an inspiration and key players for the society. Some people think that educated girls are a superfluous personality for the society i.e. they serve no useful purpose. Education is our third eye. It is very difficult to survive in today's world without education, then why shoul...