मुख्य सामग्रीवर वगळा

Enjoy Latest Podcast

आजचे आदर्श आणि आपण!!






नुकतीच  महाविद्यालयांमधील  स्नेहसंमेलने  आटोपली ,अशाच  एका  कार्यक्रमात आजच्या  तरुणाईचा  अगदी जवळून वेध घेता आला .फॅशन शो  हे मोठं  आकर्षण  असत  अशा कार्यक्रमांमध्ये  आणि मुलांमध्येही  मोठा उत्साह दिसतो .पहिल्याच फेरीत  देखण्या  तरुणांचा   आणि सुंदर ललनांचा झोकात रॅम्प वॉक पार पडला .आता दुसरी फेरी पर्यवेक्षकांच्या प्रश्नोत्तरांची  होती, मुलंही प्रश्नांची समर्पक उत्तरे देत होती, एकाला प्रश्न विचारला कि तुमचे आदर्श कोण ? त्याने क्षणाचाही विलंब करता उत्तर दिले कि  ....सर हे माझे आदर्श  आहेत मी त्यांची प्रत्येक गोष्ट फॉलो  करतो अगदी  त्यांची वेशभूषा ,केशभूषासुद्धा . आता हे संभाषण ऐकणारी मी मात्र  गोंधळात पडले की अरे हे .....  सर कोण , आपण तर त्यांना ओळखत पण नाही  जे आपल्या मुलांचे आदर्श आहेत .घरी गेल्यागेल्या आधी गुगल सर्च  केलं तेव्हा समजलं कि हे ..... सर टिकटॉक फेम नट  आहेत जे आधी दुकानात  काम करत पण  खूप मेहनत करून किंग ऑफ टिकटॉक हा 'किताब मिळवणारी हस्ती आहेत . मग मात्र विचार आला कि आता हाच प्रश्न आपल्या पिढीला असता तर नक्कीच आपले आदर्श इतिहासकालीन आहेत पण आजची पिढी त्यांचे आदर्श वर्तमानातच स्वत:च्या अवतीभोवती शोधून त्याचं अनुकरणही  करतेय.पण कधी कधी वाटते की तरुणांच्या वैचारिक क्षमता, तत्त्वांचा पाया हा त्यांच्या किशोरवयातच  पक्का रुजतो ज्यावर त्यांचा संपुर्ण आयुष्यभर प्रभाव असतो,मग आपल्या तरुणाईने असे कालातीत, मृगजळ असणारे आदर्श स्वीकारले तर आयुष्याची लढाई,जगरहाटी सर करतील का?  

थोड्याच दिवसांपूर्वी  शिवजयंती साजरी झाली तेव्हा हेच सळसळते रक्त,  छत्रपती शिवरायांचा प्रताप ,मुत्सद्देगिरी,स्त्रियांप्रती  सन्मान  वडीलधाऱ्यांच्या आदर  त्यांची शिकावण  प्रत्येक कृतीतून दर्शवत होती. ह्यावरून एक  निष्कर्ष नक्कीच काढता येतो कि आजची तरुणाई जितकी आधुनिक होतेय तितक्याच उत्साहाने आपल्या प्राचीन आणि इतिहासकालीन ठेवा ही जतन  करण्याचा आटोकाट  प्रयत्न करतेय.पण कधी कधी ह्या आधुनिक  विचारांची आणि आपल्या  जुन्या  परंपरांची  सांगड घालताना त्यांची दमछाक होतेय.  हाताशी आयतीच आलेली रक्कम , पालकांचे कनवाळू धोरण आणि दिमतीला असलेली सामाजिक माध्यमे ह्या सगळ्यांचा गुंता त्यांच्याभोवती वाढतोय. या परिस्थिती पाहता मला माझ्या रचनेत वाटते  की 

      ओतीव ज्ञानाच्या मूर्तींचा पसाराचं मांडलाय  सारा
जिवंत संवेदनशील शिल्पाचा  हरवला  कुठे  गाभारा ,
उसन्या तत्वज्ञानाची परंपरागत प्रतीकांची आधुनिकतेशी घालमेल
क्षितिजापर्यंत पोहोचलीय  स्वप्नांची  रेलचेल ,
ह्या सगळ्यांचा नाहीच कुठे अंत ,
बस , निर्वीकारा बघ जरा वळून दिसतेय का तुला
जोंधळ्यांसाठीची भ्रांत. 

आज एक पालक ,शिक्षक किंबहुना समाज म्हणून आपली जबाबदारी वाढत  आहे ,आपल्या शिक्षण क्षेत्रातल्या आव्हानांचे स्वरूप बदलत आहे .पूर्णवेळ नोकरी करणारे पालक ,एकत्र कुटुंबपद्धतीचा झालेला ऱ्हास , ह्यातून एकलकोंडी झालेली संपूर्ण एक  पिढी, माहितीचा भरमसाठ मारा,  वेळेचा अभाव ,बदलती जीवनशैली ह्या सर्व घटकांचा  समावेश आपल्याला आधुनिक समस्या म्हणून करता येईल . आजची पिढी नकार पचविणे ,अपमान सहन करणे ,पराभव स्वीकारणे  ह्या मानसिकतेतच  नसते. ह्याचा भयंकर परिणाम हा वाढत्या आत्महत्या त्याही अगदी अजाणत्या पाचवी च्या मुलांपासून ते सुज्ञ शिकल्या सावरल्या तरुणांपर्यंत , वाढते हरेक प्रकारचे गुन्हे ह्यातून अधोरेखित होते. हातात आयत्याच आलेल्या दृक-श्राव्य साधनांमुळे तरूणाई वेळेआधीच प्रौढ होतेय त्यांच्यावर हा प्रभाव इतका आहे की आभासी दुनिया वास्तवात जगू पाहताय पण शालेय महाविद्यालयीन मखमली आयुष्य संपून जगाच्या पाठीवर होणारी जोंधळ्यांसाठीची पायपीटीची जाणीव आपण करुन द्यायची आहे.  वरील समस्यांचे  निराकरण  करणे ही  काळाची गरज आहे त्यात समाधानाची बाब हीच कि तरुणाई आजही आपली पाळेमुळे ,संस्काराची बीजे  मनात कुठेतरी खोलवर रुजवून आहे गरज आहे ती आपण  समाज म्हणून योग्य पाऊले उचलून  ह्या बीजाचा वटवृक्ष व्हावा  अशी धोरणे स्वीकारण्याची ,पिढ्यांमधील संपत चाललेला संवाद पुन्हा सुरु करण्याची , मुलांना आपला वेळ देण्याची आणि एक सुदृढ मन घडवण्याची .

Prof.Pratibha Chikhale
Asst. Professor
G.H.Raisoni Jalgaon


टिप्पण्या

  1. Nice Article. Its todays reality. And also the view which is explained is true. Because of digital world it can happend.

    उत्तर द्याहटवा
  2. tarun pidhi kunala hi aadarsh manu lagli he kharay

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

Ask your question here

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

परीक्षा रद्द झाल्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या गुणांची टक्केवारी

  Emotional Haunt आपल्यासाठी घेऊन आलेले आहे पर्सेंटेज प्रेडिक्टर कॅल्क्युलेटर  परीक्षा रद्द झाल्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या गुणांची टक्केवारी जाणून घेण्यासाठी; कॅल्क्युलेटर मध्ये मागील सत्रात तुम्हाला मिळालेले ओव्हरऑल  पर्सेंटेज आणि टर्मवर्क चे पर्सेंटेज टाका क्लिक करा रिझल्ट या बटनावर आणि जाणून घ्या तुम्हाला मिळणारे अँप्रोक्स पर्सेंटेज. ऍक्युरेट रिझल्ट पाहण्यासाठी या सत्राला तुम्हाला मिळू शकणारे एक्सपेक्टटेड टर्मवर्क चे पर्सेंटेज तुम्ही टाकू शकतात. काही शंका असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा Last Year Percentage - Predictor Calculator Previous Semester % = Previous Semester Termwork % = Answer = Thank You! This calculator design by Prof.Kailas Patil, Prof.Harshal Patil Prof.Hemant Chaudhari admin@emotionhaunt.com Follow on Whatsapp Diploma Study Material Click Here to Learn all software free and get E certificate @ just Rs.50/-

अपयशाची ती कहाणी...

बालपणी हुशार आहे असे नाव त्याचे गाजले, दहावी पास होऊनी बारावीत मात्र ढोलताशे वाजले... इंजिनीअरिंगच्या प्रवेशास एक मार्क कमी पडला, तेव्हाचं खरा OBC चा नियम त्याला नडला... अपयश हाती येतां सर्व नाती झालीत उसनी, काय करावं भविष्याचं हीच त्याच्या जीवास कासनी... आशेच्या त्या किरणावर त्यानं डिप्लोमा केला, नाही ठेवला कुणाच्या उपकारांचा ठेला... त्या वर्षात प्राध्यापकही जिव्हाळ्याचे भेटले, तेसुद्धा काही नातेवाईकांच्या डोळ्यात दाटले... हरवण्यासाठी तुजला लाख गनिमी कावे झाले, पण हार कसला मानतो तो कित्येक आले अन् कित्येक गेले... यशाची दोरी हाती येतां साठले सर्व नातेवाईक अन् मित्र, परिस्थितीशी दोन हात केलेल्या महाजनांचा तो सुपुत्र... दिवस जाता जाता बदल हे वेळेने घडवले, साथ सोडुनी गेलेल्या भामट्यांना मी त्याच दिवशी पळवले... बापकमाई वर होता त्याचा पंचक्रोशीत डंका, स्वकमाई येताचं नको वाटे ती सोनियाची लंका... यशाची शिखरं गाठीत जाता लाख नवे संबंध उभारुन आले,  प्रगती बघुनी कित्येक जळाले अन् कित्येक मेले... वेळेच्या त्या दैवताला कोटी करतो मी प्रणाम, ही वेळं बदलली नसती तर नसता मिळाला दाम... या अतुलनीय यशा...

मी असतो जर का भाजी, तर भेंडी झालो असतो

मी  मोर्चा नेला नाही ही संदीप खरे यांची आठ वर्षे जुनी कविता.  हि कविता बुद्धिजीवी माणसाच्या मनातील भाव दर्शवते. बुद्धीजीवी मनुष्य म्हणजे असा मनुष्य की जो त्याचा बुद्धीचा वापर फक्त स्वतःची जीविका चालवण्यासाठी करतो.  अशा  लोकांना समाजात कुठे काय घडत आहे आणी काय नाही याच्याशी काहीही घेणेदेणे नसते. दुर्दैवाने भारतात अशा लोकांची संख्या जास्त आहे. हे तेच लोक आहेत ज्यांना वाटतं शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात. हे लोक मुकाट्याने सगळे सहन करत असतात. कुठल्याही वादविवादात पडत नाही. संघर्ष करून काही गोष्टी मिळवणे यांना माहीतच नसतात. यांची देशभक्ती फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच बघायला मिळते. देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती असून देखील आजही हे लोक शांतच आणि  शांतच राहतील. चला तर मग बघुया संदीप खरे यांची मी मोर्चा नेला नाही. मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही भवताली संगर चाले, तो विस्फ़ारुन बघताना कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना मी दगड होउनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा तो मारायाला देखिल, मज कुणी उचलले नाही नेमस्त झा...