अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द, ग्रेड नको असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 'बेस्ट ऑफ टू' चा पर्याय
राज्यातील करणाचा वाढत असलेला विळखा आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची मानसिकता व त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्यस्तरीय समितीने वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय निश्चित केला आहे.
त्यामुळे आता मागील सत्रातील गुणांच्या सरासरी वरून 50 टक्के तर अंतर्गत मूल्यमापनावरून 50 टक्के गुण देऊन त्यांच्या ग्रेट नुसार मूल्यमापन केले जाणार आहे. मात्र या विद्यार्थ्यांना ग्रेड मान्य नसेल त्यांना अपग्रेडेशन साठी संधी दिली जाणार आहे. अपग्रेडेशन ची परीक्षा दिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना पूर्वी दिलेल्या ग्रेट पेक्षा अधिक गुण मिळाले, तर ते गुण ग्राह्य धरले जातील अन्यथा पूर्वीच्या ग्रेट तसाच राहणार आहे.
प्रथम व द्वितीय वर्षातील राज्यातील सुमारे 40 लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा करण्याच्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे. तर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 1 ते 31 जुलैपर्यंत अंतिम वर्षातील सुमारे दहा लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन झाले होते. तत्पूर्वी 16 ते 31 मे पर्यंत या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचे नियोजन ठरले होते. मात्र करोनाच्या विळखा वाढू लागल्याने अद्याप प्रात्यक्षिक परीक्षेला सुरुवात झालेली नाही. आता पावसाला सुरुवात होणार असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील गोंडवाना व मुंबई विद्यापीठाने परीक्षा घेण्यास अडचण असल्याचे स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे मुंबई पुणे सोलापूर औरंगाबाद जळगाव यासह अन्य जिल्ह्यांमध्ये करोनाच्या संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील 13 पैकी 11 विद्यापीठांच्या कुलगुरूंनी परीक्षा घेणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याचे सांगितले आहे.
कुलगुरूंचा हट्टीपणा कशासाठी
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. फडणवीस व पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेता येईल असे मत नोंदवले आहे.
सोमवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील 13 विद्यापीठ विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला यावेळी त्यांनी प्रत्येक विद्यापीठाच्या परिसरातील करोनाची सध्याची स्थिती जाणून घेतली तसेच अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या.
दरम्यान राज्याच्या टॉप टेन यादीमध्ये सोलापूर व पुणे असतानाही या दोन्ही विद्यापीठांच्या कुलगुरूंनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासाठी काहिहि अडचण नसल्याचे सांगीतले आहे.
आम्ही विद्यार्थी व पालकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी सर्वे केला आहे. अंतिम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन ची सुविधा उपलब्ध असून त्यानुसार परीक्षा घेता येईल असे या दोन्ही कुलगुरूंनी बैठकीमध्ये म्हंटल अशी माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे मात्र परिस्थिती वेगळी असतानाही त्यांनी केलेल्या सर्वे बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. तरी राज्यातील कोणत्याही विद्यापीठाची परीक्षा काही कारणास्तव रद्द झाल्यास तो निर्णय राज्य भरासाठी लागू असेल असा अहवाल यापूर्वीच समितीने सरकारला दिला आहे.
त्यामुळे आता अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे परीक्षा रद्द होणार असल्याचे निश्चित झाले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सामंत यांनी राज्यस्तरीय समितीने काही दिवसांत अंतिम अहवाल द्यावा असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्य स्तरीय समिती आपला अहवाल 31 मे पर्यंत शासनाला देणार आहे
admin@emotionhaunt.com
Whatever the discussion of government body,,they should decide faster as students can rescheduled their studies for further exams..!!
उत्तर द्याहटवा