नुकतीच महाविद्यालयांमधील स्नेहसंमेलने आटोपली ,अशाच एका कार्यक्रमात आजच्या तरुणाईचा अगदी जवळून वेध घेता आला .फॅशन शो हे मोठं आकर्षण असत अशा कार्यक्रमांमध्ये आणि मुलांमध्येही मोठा उत्साह दिसतो
.पहिल्याच फेरीत देखण्या तरुणांचा आणि सुंदर ललनांचा झोकात
रॅम्प वॉक पार पडला .आता
दुसरी फेरी पर्यवेक्षकांच्या प्रश्नोत्तरांची होती, मुलंही प्रश्नांची समर्पक
उत्तरे देत होती, एकाला प्रश्न
विचारला कि तुमचे आदर्श कोण
? त्याने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले कि ....सर हे माझे आदर्श आहेत मी त्यांची प्रत्येक गोष्ट फॉलो करतो अगदी त्यांची वेशभूषा ,केशभूषासुद्धा
. आता हे संभाषण ऐकणारी मी
मात्र
गोंधळात पडले की अरे हे ..... सर कोण , आपण तर त्यांना ओळखत पण नाही जे आपल्या मुलांचे
आदर्श आहेत .घरी गेल्यागेल्या आधी गुगल सर्च केलं तेव्हा समजलं कि
हे ..... सर टिकटॉक फेम नट आहेत जे आधी दुकानात काम करत पण
खूप मेहनत करून किंग ऑफ टिकटॉक हा 'किताब मिळवणारी हस्ती आहेत
. मग मात्र विचार आला कि आता हाच प्रश्न आपल्या पिढीला असता
तर नक्कीच आपले आदर्श इतिहासकालीन
आहेत पण आजची पिढी त्यांचे आदर्श वर्तमानातच स्वत:च्या अवतीभोवती शोधून त्याचं अनुकरणही
करतेय.पण कधी
कधी वाटते की तरुणांच्या वैचारिक क्षमता, तत्त्वांचा पाया हा त्यांच्या किशोरवयातच पक्का रुजतो
ज्यावर त्यांचा संपुर्ण आयुष्यभर प्रभाव असतो,मग आपल्या तरुणाईने असे कालातीत, मृगजळ असणारे आदर्श स्वीकारले तर आयुष्याची लढाई,जगरहाटी सर करतील का?
थोड्याच दिवसांपूर्वी शिवजयंती साजरी झाली
तेव्हा हेच सळसळते रक्त,
छत्रपती शिवरायांचा प्रताप ,मुत्सद्देगिरी,स्त्रियांप्रती सन्मान
वडीलधाऱ्यांच्या आदर त्यांची शिकावण प्रत्येक कृतीतून दर्शवत होती. ह्यावरून एक निष्कर्ष नक्कीच काढता येतो कि आजची तरुणाई जितकी
आधुनिक होतेय तितक्याच उत्साहाने आपल्या प्राचीन आणि इतिहासकालीन ठेवा ही जतन करण्याचा आटोकाट प्रयत्न करतेय.पण कधी कधी ह्या आधुनिक विचारांची आणि आपल्या जुन्या
परंपरांची सांगड घालताना त्यांची दमछाक
होतेय. हाताशी आयतीच आलेली रक्कम , पालकांचे
कनवाळू धोरण आणि दिमतीला असलेली सामाजिक माध्यमे ह्या सगळ्यांचा गुंता त्यांच्याभोवती
वाढतोय. या परिस्थिती पाहता मला माझ्या रचनेत वाटते की
ओतीव ज्ञानाच्या मूर्तींचा पसाराचं मांडलाय सारा
जिवंत संवेदनशील शिल्पाचा हरवला कुठे गाभारा ,
उसन्या तत्वज्ञानाची परंपरागत प्रतीकांची आधुनिकतेशी
घालमेल
क्षितिजापर्यंत पोहोचलीय स्वप्नांची
रेलचेल ,
ह्या सगळ्यांचा नाहीच कुठे अंत ,
बस , निर्वीकारा बघ जरा वळून
दिसतेय का तुला
जोंधळ्यांसाठीची भ्रांत.
आज एक पालक ,शिक्षक किंबहुना समाज म्हणून आपली
जबाबदारी वाढत आहे ,आपल्या शिक्षण क्षेत्रातल्या
आव्हानांचे स्वरूप बदलत आहे .पूर्णवेळ नोकरी करणारे पालक ,एकत्र कुटुंबपद्धतीचा झालेला
ऱ्हास , ह्यातून एकलकोंडी झालेली संपूर्ण एक
पिढी, माहितीचा भरमसाठ मारा, वेळेचा
अभाव ,बदलती जीवनशैली ह्या सर्व घटकांचा समावेश
आपल्याला आधुनिक समस्या म्हणून करता येईल . आजची पिढी नकार पचविणे ,अपमान सहन करणे
,पराभव स्वीकारणे ह्या मानसिकतेतच नसते. ह्याचा भयंकर परिणाम हा वाढत्या आत्महत्या
त्याही अगदी अजाणत्या पाचवी च्या मुलांपासून ते सुज्ञ शिकल्या सावरल्या तरुणांपर्यंत
, वाढते हरेक प्रकारचे गुन्हे ह्यातून अधोरेखित होते. हातात
आयत्याच आलेल्या दृक-श्राव्य साधनांमुळे तरूणाई वेळेआधीच प्रौढ होतेय त्यांच्यावर हा
प्रभाव इतका आहे की आभासी दुनिया वास्तवात जगू पाहताय पण शालेय महाविद्यालयीन मखमली
आयुष्य संपून जगाच्या पाठीवर होणारी जोंधळ्यांसाठीची पायपीटीची जाणीव आपण करुन द्यायची
आहे. वरील
समस्यांचे निराकरण करणे ही
काळाची गरज आहे त्यात समाधानाची बाब हीच कि तरुणाई आजही आपली पाळेमुळे ,संस्काराची
बीजे मनात कुठेतरी खोलवर रुजवून आहे गरज आहे
ती आपण समाज म्हणून योग्य पाऊले उचलून ह्या बीजाचा वटवृक्ष व्हावा अशी धोरणे स्वीकारण्याची ,पिढ्यांमधील संपत चाललेला
संवाद पुन्हा सुरु करण्याची , मुलांना आपला वेळ देण्याची आणि एक सुदृढ मन घडवण्याची
.
Prof.Pratibha Chikhale
Asst. Professor
G.H.Raisoni Jalgaon
Kupach chhan
उत्तर द्याहटवाNice kup chan
उत्तर द्याहटवाMast ! Reality khup chan mandli ahe
उत्तर द्याहटवाChan
उत्तर द्याहटवाsuperb mam
उत्तर द्याहटवाIt's today's reality. Nice article
उत्तर द्याहटवाSuperb mam
उत्तर द्याहटवाWell written mam...!!
उत्तर द्याहटवाNice one mam
उत्तर द्याहटवाNice one madam.....!!
उत्तर द्याहटवाNice mam
उत्तर द्याहटवाReal theory off students life and youth
उत्तर द्याहटवा❤🙏🏻🤝🏻👏🏻👍🏻👏🏻🤝🏻🙏🏻❤
उत्तर द्याहटवाPratibha Mam 😍 Nicely Written 😄👌🏼
उत्तर द्याहटवाMotivational Blog💯👌👍.......Kup Chaan Blog aah Mam👌💯
उत्तर द्याहटवाThank you all
उत्तर द्याहटवाNice Article. Its todays reality. And also the view which is explained is true. Because of digital world it can happend.
उत्तर द्याहटवाKhupach chhan...
उत्तर द्याहटवाtodays reality
उत्तर द्याहटवाtarun pidhi kunala hi aadarsh manu lagli he kharay
उत्तर द्याहटवाIts reality
उत्तर द्याहटवाNice and true
उत्तर द्याहटवाWell Said�� Reality
उत्तर द्याहटवावास्तव ...
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाRealistically narrated
उत्तर द्याहटवाRealistically narrated
उत्तर द्याहटवाNice mam
उत्तर द्याहटवाthank you all
उत्तर द्याहटवा